पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील किमान व कमाल तापमानात ३ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्या भागात पश्चिमी चक्रवाताचा जोर कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे.
दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे तामिळनाडू किनारपट्टी ते मराठवाडा आणि विदर्भावर हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाड्यात शुक्रवारी आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. यामध्ये विदर्भात पावसाचा जास्त जोर राहण्याचा अंदाज आहे. तसेच ९ ते १४ अशा पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.
असा आहे अंदाज
मध्य महाराष्ट्र : १० आणि ११ फेब्रुवारी
मराठवाडा : १० आणि ११ फेब्रुवारी
विदर्भ : १० ते १४ फेब्रुवारी
गुरुवारचे किमान तापमान खालीलप्रमाणे
पुणे १४
अहमदनगर १४.४
जळगाव १४.५
कोल्हापूर २०.७
महाबळेश्वर १५.१
मालेगाव १६.६
नाशिक १४.६
सांगली १९.८
सातारा १७.५
सोलापूर २०.२
धाराशिव १८.४
छत्रपती संभाजीनगर १६.२