Politics पुणे : मी फक्त शरद पवारांच ऐकतो, तसेच मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. सत्य बोलतो, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दिल आहे.
राऊत म्हणाले…!
‘राष्ट्रवादी फुटीच्या चर्चेला मी जबाबदार नाही. शरद पवारांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांच ऐकतो. अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर पडली. मी मविआचा चौकीदार आहे. सेनाफुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आम्ही उघडा केला. वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता? फोडण्याचं कारण काय शिवसेना फुटली तेव्हा तुम्हीदेखील वकिली करत होता.
ते आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की, आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत रहावा आणि त्याचे लचके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल. त्यासाठी जर आमच्यावर कोणी खापर फोडणार असले तर ही गमंत आहे. त्यामुळे आम्ही भूमिका घेतली. यात चुकीचं काय आहे.’
काय म्हणाले होते अजित पवार
संजय राऊत यांनी अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाबाबत भाष्य केलं होतं. तसेच शिवसेनेच्या मुखपत्रातून यावर टिप्पणी केली होती. यावरून काल अजित पवार यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यवर टीका केली होती. अजित पवार म्हणले होते की, ‘ काही काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे.
तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्याबद्दल सांगा. ज्या पक्षाचं मुखपत्र आहे, त्याबाबत बोला. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडण्यास खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र कोणी घेण्याचं कारण नाही. आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते मग ते राष्ट्रीय किंवा राज्यातील स्तरावर मजबूत आहे.’