MLA Ashok Pawar शिरूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गरीब व निराधार रुग्णांसाठी १० टक्के राखीव खाटा सवलत योजना राबवली जाते. सुमारे ४७५ रुग्णालये या योजनेखाली आहेत. वर्षाला जवळपास अडीच हजार कोटी रु. ही रुग्णालये रुग्णांवर खर्च करतात. परंतु, अनेक रुग्णालये रुग्णांना नाहक त्रास देतात. याठिकाणी २४ तास पीआरओ उपस्थित पाहिजेत.(MLA Ashok Pawar)
गरीब व निराधार रुग्णांसाठी १० टक्के राखीव खाटा सवलत योजना.
मात्र तेथील पीआरओ संध्या. ०७:०० वा. घरी जातात. यावेळेनंतर रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मदत मिळत तर नाहीच, लोकप्रतिनिधींचे फोन देखील उचलले जात नाहीत. बऱ्याच रुग्णालयात महिला पीआरओ आहेत. त्यांना फोन लावणे सुद्धा कठीण होते. अशावेळी गरीब रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी सिस्टीम लावली पाहिजे.(MLA Ashok Pawar)
रुग्णालयांना जर सामान्य लोकांची जागा दिली जाते. तर त्या जागेच्या मोबदल्यात वार्षिक नफ्याच्या दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक आहे. काही रुग्णालयांची महिन्याची बिलं १०० कोटी आहेत, याचा अर्थ त्या रुग्णालयाला २ कोटी रु. इतकी रक्कम गरिबांवर खर्च करायचे आहेत. परंतु ते केलं जात नाही.(MLA News)
दरम्यान, अनेकवेळा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या तक्रारी कराव्या लागतात. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे या रुग्णांना औषधं व जेवण रुग्णालयाकडून दिलं जाणं क्रमप्राप्त आहे. मात्र अनेकदा ते बाहेरून आणावे लागते. मग या योजनेचा फायदा काय? याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे.(MLA Ashok Pawar)
पुण्यासारख्या शहरात १८६७ साली डेविड ससून नावाच्या माणसाने ससून रुग्णालय उभं केलं. त्याला जवळपास १५६ वर्षे झाली. महाराष्ट्रामध्ये आपण दुसरं ससून रुग्णालय आजपर्यंत उभं करू शकलो नाही. त्याठिकाणी फक्त एक सिटी स्कॅन व एक एमआरआय मशीन उपलब्ध आहे. १५०० खाटा असलेल्या एवढ्या मोठ्या रुग्णालयाला ही मशीनरी पुरेशी नाही. त्यामुळे तेथील मशीनरी मोठ्या प्रमाणात वाढल्या पाहिजेत. अशा अनेक महत्वाच्या मागण्या माननीय आमदार अॅड. अशोक पवार यांनी विधानसभेत शासन दरबारी मांडल्या.