पुणे प्राईम न्यूज: यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांती पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. नोबेल समितीने महिला स्वातंत्र्य आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याचे मान्य केले आहे. त्यांना 13 वेळा अटकही झाली होती.
BREAKING NEWS
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2023 #NobelPeacePrize to Narges Mohammadi for her fight against the oppression of women in Iran and her fight to promote human rights and freedom for all.#NobelPrize pic.twitter.com/2fyzoYkHyf— The Nobel Prize (@NobelPrize) October 6, 2023
51 वर्षीय नर्गिस अजूनही इराणमध्ये कैद आहेत. त्यांना 31 वर्षे तुरुंगवास आणि 154 फटके मारण्यात आले आहेत. सरकारविरोधात अपप्रचार केल्याच्या आरोपावरून इराणने त्याला अटक केली आहे. नोबेल मिळाल्यानंतर नर्गिस यांना 8.33 कोटी रुपयांचे बक्षीस आणि सुवर्णपदक देण्यात येणार आहे.
हेही वाचा:
Pune News : कोरेगाव पार्क, मुंढवा येरवडा भागात जड वाहनांना बंदी