मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराला चांगलाच रंग चढत असलेला दिसत आहे. अशातच आज मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात एकीकडे महायुतीची विचारधारा आहे, जी यावर अभिमान बाळगते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे विचार आहेत. जे महाराष्ट्राचा अपमान करत आहे. महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झाले आहेत. ही आघाडी आहे, जी राममंदिराचा विरोध करते, जे मतांसाठी भगवा आतंकवाद असा शब्द आणते. ही जी आघाडी आहे, ते नेहमी वीर सावरकरांचा अवमान करते. काश्मीरमध्ये कलम ३७० च्या वापसीसाठी प्रस्ताव मंजूर करते. असं म्हणत पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडत आहे. पाण्याविना मासे तडफडतात, तसे ओबीसी एसटीची एकजूट तोडू पाहत आहेत. म्हणून ते आपापसात त्यांच्यात भांडणे लावतात. मजबूत काँग्रेस होईल. एसटी-एससी, ओबीसींना उद्ध्वस्त करतील. म्हणून मी वारंवार सांगतो की, आघाडीचे लोक ज्या प्रकारे कारनामे करत आहेत, तेव्हा एक गोष्ट खूप महत्वाची झाली आहे. की एक है तो सेफ है.
मुंबईत तर बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांचे शहर..
मुंबईत तर बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांचे शहर आहे. स्वाभिमानाचं शहर आहे. पण आघाडीत एक असा पक्ष आहे ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
भाजपा महायुती आहे तर गती आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा भाजपा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. असा असल्याचा नारा दिला. आमच्यासोबत म्हणजेच महायुतीसोबत संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात आज या निवडणुकीची ही माझी अखेरची प्रचारसभा आहे. मी या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र, कोकण प्रत्येक भागातील लोकांशी संवाद साधला. सर्वकडे एकच आवाज ऐकू येत आहे, तो म्हणजे भाजपा महायुती आहे तर गती आहे.
महाराष्ट्रात एकीकडे महायुतीची विचारधारा आहे, जी यावर अभिमान बाळगते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे विचार आहेत, जे महाराष्ट्राचं अपमान करते. महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झाले आहेत. ते राममंदिराचा विरोध करतात. मतांसाठी भगवा आतंकवाद असा शब्द वापरतात. ही जी आघाडी आहे, ते नेहमी वीर सावरकरांचा अवमान करते. काश्मीरमध्ये कलम ३७० च्या वापसीसाठी प्रस्ताव मंजूर करते. असं ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.