Uruli Kanchan : : उरुळी कांचन, (पुणे) : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अनुज्ञप्ती चाचणीसाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे आयोजित शिबीर कार्यालय १४ जून ऐवजी २६ जून रोजी घेण्यात येणार आहे. (Territorial transport camp at Uruli Kanchan cancelled; ‘This’ will be the new date..)
उरुळी कांचन येथे पालखी प्रयाण करणार आहे. त्यामुळे १४ जून रोजी होणारे शिबिर रद्द करून ते १६ जून रोजी घेण्यात येणार आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन कडून देण्यात आली आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा बदल
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी पुणे येथून सोलापूर महामार्गावरून (Uruli Kanchan) उरुळी कांचनकडे १४ जुन २०२३ रोजी प्रयाण करणार आहे. या दिवशी पुणे-सोलापूर महामार्गावरील इतर वाहतूक बहुतांश प्रमाणात बंद असते. त्यामुळे शिबीर कार्यालयामध्ये पोहोचताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, ज्या उमेदवारांना अनुज्ञप्ती चाचणीसाठी उरुळी कांचन (Uruli Kanchan) शिबीर कार्यालयातील १४ जून रोजीची अपॉइंटमेंट मिळालेली आहे अशा उमेदवारांनी अनुज्ञप्ती चाचणीसाठी २६ जून रोजी शिबीर कार्यालयाच्या पूर्वनियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे.