पुणे: राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे यावर्षी राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा जून-जुलै अगोदरच वाढायला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्टरातील पुणे, सोलापूर, सातारा सांगली या भागात मुसळधार पाऊस झाल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. केवळ २ दिवस झालेल्या पावसामुळे उजनी धरणाची पातळी प्लस झाली आहे.

राज्यभरातील लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा वेगाने वाढत आहे. सोलापूर , धाराशिव, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे समजलं जाणारा उजनी धरण मे महिन्यात पहिल्यांदाच प्लस मध्ये आले आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण धरणांमध्ये आता 28.45% पाणीसाठा शिल्लक आहे. या जलसाठ्यात वेगाने वाढ होताना दिसत आहे. 25 आणि 26 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणामध्ये पाणी पातळी वाढली आहे.








