उरुळी कांचन : संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अष्टापूर विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांनी एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना चितपट केल आहे.
अष्टापूर विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक चुरशीने लढवत हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप व त्यांचे बंधू यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्यानेतृत्वाखाली पॅनेलने १३ विरुद्ध ० अशी एकतर्फी बाजी मारत विजय मिळवला. या निवडणुकीत विरोधकांना मोठ्या फरकाने पराभव करत त्यांनी हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील पकड अधोरेखित ठेवली आहे.
अष्टापूर सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांना आव्हान देण्याचा प्रयत्न
‘यशवंत’ चे विद्यमान संचालक शामराव कोतवाल, कारखान्याचे माजी संचालक श्रीहरी कोतवाल यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीला हवेलीत विशेष महत्त्व प्राप्त झालेहोते. मतदानाअखेर मात्र विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे
मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन चव्हाण यांनी जाहीर केलेल्या निकालात पॅनेलच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय झाले आहेत.
दरम्यान विजयानंतर या सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हित जोपासण्याचे प्रयत्न करण्यात येईल,संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या निगडीत अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येऊन,संस्थेची पुढील वाटचाल उत्तम नियोजनात करण्यात येईल असा विश्वास पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांनी व्यक्त केला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:-
*सर्वसाधारण मतदारसंघ :-
लिंबाजी सखाराम जगताप, नितीन अंकुश मेमाणे, अभिमन्यू गणपत कोतवाल, अतुल सुखदेव , दत्तात्रय साहेबराव कोतवाल, केरबा बबन कोतवाल, विनायक अर्जुन कोतवाल, बाळासाहेब साहेबराव कोतवाल.
*महिला राखीव मतदारसंघ :-
छाया राजाराम कोतवाल,. तुळसाबाई भाऊसो कोतवाल
*इतर मागास प्रवर्गा
सुभाष बारीकराव कोतवाल
*अणु जाती /जमाती प्रवर्ग
शंकर दादू पाटोळे
*भटक्या जाती /जमाती प्रवर्ग
भगवान शंका गडदे