लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीचा निकाल सोमवारी (ता. 5) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर बारावीच्या परीक्षेत नयन संजय काळभोर या विद्यार्थिनीने 92.67 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्य रिपल शर्मा यांनी दिली आहे.
बारावीच्या परीक्षेत विद्यालयातील कला शाखेतील 19 विद्यार्थी , वाणिज्य शाखेतून 103 विद्यार्थी तर विज्ञान शाखेतून 120 असे एकूण 242 विद्यार्थी बसले होते. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाच्या वाणिज्य विभागातून नयन संजय काळभोर या विद्यार्थिनीने 92.67 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक, तर सुधीक्षा दत्तात्रय जोरे हिने 92.17 गुण मिळवून द्वितीय तर रोहित संभाजी जगताप याने 90.33 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
कला शाखेतून गौरी रविकांत लोंढे हिने 88.67 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक, तर सबिया अप्सरपाशा सय्यद हिने 87.00 टक्के गुण मिळवून द्वितीय तर नरेंद्र सिद्राम तलाठी याने 80.67 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विद्यालयाच्या विज्ञात विभागात पृथ्वीराज गणेश धुमाळ याने 87.83 टक्के गुण मिळवून प्रथम, हेल्ली राकेशकुमार गांधी हिने 87.17 टक्के गुण मिळवून द्वितीय तर ओंकार शंकर सरफाळे याने 86.67 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, विद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी नयन काळभोर हिने अकाउंटिंग या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे लोणी काळभोर सह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे एमआयटीच्या मुख्य कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे व शैक्षणिक विभाग प्रमुख ज्योती ज्योतवानी यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.