पुणे : पुण्यातील अपघाताचे वाढते प्रमाण बघता वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमाचे भंग करणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. अशातच आता पुण्यातील नवले ब्रिजजवळ झालेल्या एका कारवाईत एका मद्यधुंद व्यक्तीने चक्क वाहतूक पोलिसांचीच कॉलर धरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रसिद्ध अशा नवले ब्रिजजवळ वाहतूक पोलीस ड्रंक अँड ड्राइव्हची चेकिंग करत असताना हा प्रकार घडला आहे. चेकिंगच्या वेळी वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून एका तरुणाला वाहन चालवताना पकडले. मात्र तरुणांने स्वतःची चूक मान्य न करता पोलिसांसोबत हुल्लडबाजी केली.त्यानंतर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यातील नवले ब्रिजजवळ घटना. #pune #viralvideo #punepolice pic.twitter.com/Kc09WG4Sjg
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) April 19, 2025
येथे पहा व्हिडिओ
ही घटना घडत असताना आसपासचे नागरीक,प्रवासी थांबून हे काय घडतय पाहत होते. दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन कठोर कारवाई करत असून काहीजण कायद्याचा धाक न बाळगता सरासपणे नियम मोडताना दिसत आहेत.