पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड येथे कार्यक्रम व्यवस्थापक, आयुष वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, शिक्षक/शिक्षण कर्मचारी, ब्लॉक अकाउंटंट यासह इतर अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नांदेड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कार्यक्रम व्यवस्थापक, आयुष वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, शिक्षक/शिक्षण कर्मचारी, ब्लॉक अकाउंटंट, तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (स्टाफ नर्स (महिला/पुरुष) आणि एमपीडब्ल्यू.
– नोकरीचे ठिकाण : नांदेड.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी 2024.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://zpnanded.in/ वरून माहिती घेता येणार आहे.