Job News नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत नोकरी मिळावी, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यानुसार, अनेकजण प्रयत्नही करतात. अशाचप्रकारे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. नॉर्थ ईस्टर्न रेल्वे विभागात विविध जागांसाठी भरती केली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, नॉर्थ ईस्टर्न रेल्वे, गोरखपूर येथे ही भरती होणार आहे. (Job News)
अर्ज करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली असून, आता अर्ज करण्याची अंतिम तारीखही जवळ आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या रिक्त जागांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी उशीर न करता त्वरित अर्ज करावा. (Job News)
अशी असेल भरती प्रक्रिया…
रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2023 असणार आहे. या भरती मोहिमेद्वारे विविध ट्रेडमधील एकूण 1104 पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती ईशान्य रेल्वेच्या वेगवेगळ्या युनिट्ससाठी आहे.
इथे करा अर्ज
रेल्वेच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला नॉर्थ ईस्टर्न रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी ner.indianrailways.gov.in या वेबसाईटवर अधिक माहिती घेता येऊ शकणार आहे.
काय आहे पात्रता?
अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये किमान 50 टक्के गुणांसह डिप्लोमाही असावा.
वयोमर्यादा काय?
वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज शुल्क किती?
गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. UR आणि OBC उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्ग, पीएच आणि महिला उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.