Gautami Patil News : : नाशिक : वलखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक) जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स वादात सापडला आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी हा डान्स झाला होता. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या डान्सचा आनंद लुटला होता. (Gautami Patil News) मात्र गौतमीचा हा डान्स वादात सापडला आहे. या डान्सनंतर शालेय शिक्षण विभाग आक्रमक झाला आहे. यामुळे आयोजकांचं टेन्शन वाढलं आहे.
शालेय शिक्षण विभाग आक्रमक
वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवसा विद्यार्थी शिक्षण घेत असतात. दिवसा चालणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र डीजे चे मोठमोठे स्पीकर्स सुरु होते. या स्पिकर्सवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नृत्य करत होती.(Gautami Patil News ) गौतमीच्या नृत्याने परिसरातील तरुणांची मने भिजवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान, विविध मद्याच्या ब्रँड साठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. गौतमी पाटीलने जरी या कार्यक्रमच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त केलं असलं तरी आयोजकांचं टेन्शन वाढणार आहे. कारण शाळेच्या पटांगणात गौतमीचा क्रार्यक्रमात आयोजित केल्याने आयोजकांवर कारवाई होऊ शकते.
या घटनेनंतर एका वृत्तवाहिनीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधला. आम्ही कोणतीही शाळा दत्तक दिली नाही. तसेच दारु कंपनीला शाळा दत्तक देण्याची काही योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाळेच्या मैदानात डान्सचा प्रकार घडला असेल तर तो नक्कीच धक्कादायक आहे. (Gautami Patil News) संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा यावेळी केसरकर यांनी केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत अशाप्रकारे नृत्याचे प्रकार होऊ शकत नाही. याप्रकरणी चौकशी केली जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Gautami Patil News : पाटील आडनावाचा वाद, गौतमीच्या समर्थनार्थ सुषमा अंधारे मैदानात