लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक काळानुसार ज्ञानरूपी प्रगतीच्या वाटेने वाटचाल करण्यासाठी पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने डिजिटल क्लासरूम देण्यात आले. पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने नगरपरिषदेच्या शाळेला २ व महात्मा फुले विद्यामंदिरास १ असे तीन डिजिटल रूमचे साहित्य देण्यात आले.
डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडणार
प्रास्ताविकात बोलताना पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी म्हणाले, डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, पाचगणी रोटरी क्लबच्या सौजन्याने मराठी शाळेतील विद्यार्थी आता डिजिटल क्लासरूम अनुभवणार आहेत.(Pachgani News) डिजिटल क्लासरूममुळे आता इंग्लिश मीडियमच्या बरोबरीने मराठी शाळाही प्रगतीच्या दिशेने पुढे जाणार आहेत.
रोटरीयन शिवाजी शिंदे म्हणाले, डिजिटल क्लासरूममुळे सर्व चित्ररूपी माहिती मिळून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. रोटरीयन भारत पुरोहित म्हणाले, सर्वसामान्य लोकांची मुले मराठी शाळेत शिकत असतात. मराठी शाळेत मुलांना पाठविणे आत्ताच्या काळात कमी लेखले जाते. (Pachgani News) परंतु, ‘डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडणार आहे.
यावेळी पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी, रोटरीयन ऋशी होळकर, शिवाजी शिंदे, भारत पुरोहित, जयवंत भिलारे, अशोक पाटील,शाम चौरसिया, विशाल रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते. जयवंत भिलारे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज – मुख्याधिकारी निखिल जाधव
Pachgani news : विश्वकर्मा नागरी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – अध्यक्ष शेखर भिलारे