पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai phule pune university) गणेश अथर्वशीर्षावरच्या सर्टिफिकेट कोर्सला (Ganpati Atharva shirsha course) सुरूवात झाली आहे.मात्र या कोर्सला विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
प्रा हरी नरके यांनी या कोर्सला विरोध दर्शवला आहे. सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे.
पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्ने ही सनातनी मंडळी रंगवत आहेत. हे धोकादायक पाऊल आहे. तर ब्राह्मण महासंघाने उर्दू प्रार्थना चालते तर अथर्वशीर्ष का नको,असा सवाल नरके यांनी केला आहे. मात्र हा कोर्स अनिवार्य नाही ऐच्छिक स्वरुपाचा आहे. ज्यांना हा कोर्स नको आहे त्यांच्यावर प्रवेशासाठी सक्ती नाही, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू करणे हा काळाचा उलटा प्रवास आहे. हे पाऊल पुन्हा पेशावाईकडे घेऊन जाणारे आहे. पेशवाईची स्वप्नं ही सनातनी मंडळी रंगवत असून त्यासाठी विद्यापीठे वेठीला धरली जात आहेत. हे धोकादायक पाऊल आहे. संस्कृतमध्ये अनेक सुंदर आणि मौलिक ग्रंथ आहेत ते शिकवण्याऐवजी अगदी अलीकडील असलेले अथर्वशीर्ष शिकायला लावणे योग्य नसल्याचे हरी नरके म्हणाले.