संदीप टूले
Daund News : दौंड : संपूर्ण राज्यात २५ मे रोजी १२ वी चा निकाल जाहीर झाला. यात अनेक ठिकाणी मुलींनीच बाजी मारलेली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे. असाच एक निकाल खुटबाव (ता.दौंड) येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च मध्यमिक विद्यालयाचा लागला आहे. (In Khutbav’s Bhairavanath Higher Secondary School Class 12 results, girls beat the competition)
विज्ञान शाखेचा निकाल ९० टक्के
या विद्यालयाच्या मुलींनीही बारावीच्या परीक्षेत बाजी मारली असून विज्ञान शाखेचा (९०.०२%) निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल (कंसात टक्केवारी)
१) विशाखा नातू (८८.५०%)
२) ऋतुजा तिखोळे (७४.१७%),
३) अंजली थोरात (७०.८३%),
वाणिज्य शाखेचा निकाल
१) मयुरी नवले,(८१.३३%),
२) रवींद्र चांदगुडे (६८.५०%),
३) सुप्रिया काटे (६२.५०%)
कला शाखेचा निकाल
१) सृष्टी थोरात (७१.१७%),
२) वैष्णवी जानकर (६४.५०%),
३) पुनम शेलार (५९.१७%),
दरम्यान, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात, भाऊसाहेब ढमढरे (उपाध्यक्ष), सूर्यकांत खैरे (सचिव), अरुण थोरात (खजिनदार), सुदाम भापकर , प्राचार्य एस व्ही तांबे सर यांनी अभिंनंदन केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Daund News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन चोरीच्या घटना उघडकीस, तिघांना बेड्या
Daund News : पतीनेच अपहरण करून पत्नीचा केला खून, हत्या करून मृतदेह फेकला उसाच्या शेतात
Daund News : दौंड तालुक्यातील अनिता मोरे यांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती