लोणी काळभोर : राष्ट्रीय सॅम्बे चैंपियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दबदबा ठेवला असून या स्पर्धेत लोणी काळभोर (ता.हवेली) येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २० पदके जिंकली आहेत.
भगवती नगर, जम्मु कश्मीर स्पोर्टस कॉम्पलेक्स मध्ये आयोजित राष्ट्रिय सम्बो चैंपियनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चांगल्या प्रकारे प्रदर्शन करून सुवर्णपदक आणि रौप्यपदक अशी २० पदके जिंकली आहेत. विजेत्या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली असून हे खेळाडू कजाकीस्थानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सम्बो एशियन चैंपियनशिपमध्ये खेळणार आहेत.
या स्पर्धेत सृष्टी उगडे, श्रीपादकुमार आटोळे, खाकेंद्र रावत, मैत्रयी संकपाळ, झोया शेख,सेजल सिंग यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
तर वेदांत शर्मा, अर्णव जाधव, प्रणव साळुंखे, समर्थ खवले, आदेश भापकर, वेदांत सरवडे, समृद्धी दंडे, रोशनी खटके, वैष्णवी शिंदे, अक्षरा सूर्यवंशी, हर्षदा थोरात, तनिष्का मगर, यश ननावरे, अकिफा शेख यांनी कांस्य पदकांची कमाई केली.
विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र स्पोर्टस सॅम्बो अ असोसिएशनचे सचिव कुमार उगाडे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर टीम कोच म्हणून संजय जिनवान, मनिषा पाटिल, टेक्नीकल कमिटी मध्ये सेजल सिंग, नंदिनी उगाडे यांचे सहकार्य मिळाले. विजेत्या खेळांडूचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.