नवी दिल्ली : नवीन आयकर विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. त्यानंतर आयकर कायदा, 2025 म्हणून ओळखले जाईल. नवीन आयकर विधेयक संसदेत सादर केले जाईल. नवीन विधेयक सहा दशके जुन्या आयकर कायदा, 1961 ची जागा घेणार आहे. नवीन आयकर विधेयक संपूर्ण भारतात लागू केले जाईल आणि 1 एप्रिल 2026 पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या या नव्या विधेयकाचा उद्देश भारतातील कर संरचना सुलभ आणि आधुनिक करणे हा आहे, ज्यामुळे करदात्यांना एक निष्पक्ष आणि पारदर्शक प्रणाली मिळणार आहे. त्यामुळे याचे पालन करणे सोपे होणार आहे. याशिवाय, विधेयकात वापरण्यात आलेली भाषा सध्याच्या कायद्यापेक्षा सोपी असणार आहे. विधेयकाच्या सोप्या भाषेमुळे अनेक अडचणी दूर होतील, असे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे करदाते आणि कर विभाग दोघांनाही फायदा होईल.
नवीन आयकर विधेयकाबाबत महत्त्वाचे मुद्दे
– नवीन विधेयकाच्या मसुद्यात सूट देण्याबाबतच्या नियमांची माहिती वेगवेगळ्या विभागांमध्ये देण्यात आली आहे.
– नवीन आयकर विधेयक, 2025 मध्ये 536 कलमांचा समावेश आहे. तर सध्याच्या आयकर कायदा, 1961 मध्ये 298 कलमे आहेत. सध्याच्या कायद्यात 14 मिनिट्स आहेत तर नवीन कायद्यात 16 असतील.
– प्राप्तिकर कायदा, 1961 च्या जागी नवीन आयकर विधेयक 622 पानांचे असणार आहे तर विद्यमान विधेयक 880 पानांचे आहे. नवीन विधेयकात बहुतांश उपकलम रद्द करण्यात आले आहेत.