Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : लोन ॲपच्या माध्यमातून एका ३७ वर्षांच्या महिलेची बदनामीसह फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उरुळी कांचन परिसरात घडला आहे. हा प्रकार २४ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी फसवणुकीसह बदनामी आणि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. Uruli Kanchan News
ऑन लाईन कर्ज घेणे हे किती मनस्ताप देणारे ठरू शकते याचा अनुभव उरुळी कांचन येथील एका कुटुंबाला आला आहे. पिडीत महिलेच्या मोबाईलवर दुसऱ्या व्यक्तीचे एकत्रित असलेले अश्लील फोटो बनवून ते नातेवाईकांना पाठविण्यात आले आहेत. या घटनेने सदर महिला हि मानसिक दबावाखाली आली आहे. Uruli Kanchan News
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पिडीत महिला हि उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत राहते. तिचे इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर खाते आहे. फिर्यादी महिला एके दिवशी इन्स्टाग्राम पाहत असताना ऑन लाईन कर्ज देणाऱ्या “गोल्डन रुपी” या अॅप वरुन केवळ ३ हजार ७०० रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज घेताना विविध माहिती भरत अॅप डाऊनलोड करण्यास एका व्यक्तीने सांगितले. पैशांची गरज असल्याने महिलेने ते घेतलेही मात्र याच दरम्यान आपल्या मोबाईलमधील सर्व माहिती, विविध क्रमांक हे सायबर गुन्हेगाराने स्वतःकडे घेतले. Uruli Kanchan News
ॲप डाऊनलोड करून व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहितीसह स्वतःचा फोटो अपलोड केला होता. त्यानंतर त्यांनी लोनसाठी ॲपद्वारे अर्ज केला होता. अर्ज मजूर होऊन महिलेची बँक खात्यात लोनची रक्कम जमा झाली. दिलेल्या मुदतीमध्ये महिलेने लोन म्हणून घेतलेले पैसे व्याजासहित भरले. त्यानंतर तरुणीला वेगवेगळ्या मोबाईलवरुन पैसे जमा करण्यासाठी धमकी येत होती.
दरम्यान, पैसे जमा केले नाहीतर त्याचे अश्लील फोटो कुटुंबीयांसोबत इतरांना पाठवून त्याची बदनामी करण्याची धमकी दिली होती. आपली बदनामी होऊ नये या भीतीपोटी महिलेने सर्व पैसे भरले. तरीसुद्धा महिलेला फोन करून आणखी पैशांची मागणी करण्याचा प्रकार सुरूच होता. आणखी पैसे दिले नाहीत त्यामुळे सदर महिलेचे अश्लील फोटो बनवून नातेवाईकांना पाठविले. याप्रकरणी उरुळी कांचन येथील महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे.