Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 16 May 2025, 20:31

चाकण, (पुणे) : प्रवास करताना महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

 

अनिकेत गोपाळ सुरवसे (वय – 22) व हर्ष सतिश जाधव (वय 23) यांना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या चौकशीतून आणखी दोन साथीदार आकाश सतिश बिरादार व सुदर्शन नामदेव यादव (रा. सर्वजण मांजरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी 3 लाख 47 हजार रुपयांचे सव्वा चार तोळे सोन्याचे दागिने, दोन पल्सर मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे २०२५ रोजीराजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी केशर कुशल भोईर (वय 31, व्यवसाय शिक्षक, रा. धोंडपाडा, ता. पेण, जि. रायगड) या आपल्या नातेवाइकांसह मांढरदेवी दर्शनासाठी आल्या होत्या. शिवरे, (ता. भोर) येथील एपीसीएल सीएनजी पंपावर थांबल्या असता, मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने हिसकावून पळ काढला होता. त्यानुसार भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्यात आली. गुन्हयात वापरलेली मोटार सायकल ही अनिकेत सुरवसे (रा. ए.एम. कॉलेज समोर, मांजरी पुणे )याचेजवळ असून तो हिंजवडी परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, हिंजवडी परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आकाश बिरादार आणि हर्ष जाधव यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी यवत व बारामती तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत देखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत असून, आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार अमोल शेडगे, मंगेश भगत, धीरज जाधव, राजु मोमीण, अजय घुले, योगेश नागरगोजे, श्रेणी पोसई ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर, तुषार भोईटे, बाळासाहेब खडके, वैभव सावंत, राहुल घुबे, राहुल पवार, समाधान नाईकनवरे, रणजित कोंडके, अतुल फरांदे, दगडु विरकर, तसेच राजगड पोलीस ठाण्याचे पोसई अजित पाटील, अंमलदार अक्षय नलावडे यांनी केली असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.