लोणी काळभोर, (पुणे) : Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे कल्याण मटका (Matka-gambling) घेणाऱ्या (7 persons) ७ जणांवर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी छापा (Social Security Department raids) टाकून जुगाराचे साहित्य रोख रक्कम असा ७९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. १७) कदमवाकवस्ती (Kadamwakwasti) ग्रामपंचायत हद्दीत केली आहे. (Loni Kalbhor Crime)
७ जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात काही व्यक्ती बेकायदेशीरपणे मटका जुगाराची कटींग घेऊन तसेच मोबाईलवर व्हॉट्सअँपवर ऑनलाईन कल्याण मटका घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन कल्याण मटका घेणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी पाळत ठेवून ७ जणांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण ७९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.