Selfie News मुंबई : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेकजण पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करत असतात. (Selfie News) अशावेळी उत्साहातही सावधगिरी आणि काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.(Selfie News) मात्र अशा ठिकाणी अनेकदा नसते धाडस केले जाते आणि अनर्थ घडतो. (Selfie News)
सध्या मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवर सेल्फीच्या नादात डोळ्यादेखत आईला वाहून गेल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तर या घटनेचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर येत आहे. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे वाहत्या पाण्यात मध्यभागी बसून फोटो काढत असल्याचे दिसत आहे. पाण्याचा वेग इतका आहे की भल्यामोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळताना दिसत आहेत मात्र तरीही हे दोघे तशाही परिस्थितीत फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये त्यांची मुलेही किनाऱ्यावर उभे राहून बाहेर येण्यासाठी आवाज देत असल्याचे दिसत आहेत. मात्र त्यांचा हा हलगर्जीपणाच त्यांना महागात पडला. काही वेळाने मागून येणारा पाण्याचा प्रवाह दोघांनाही पाडतो. ज्यामुळे ते दोघेही पाण्यात वाहून जातात.
दरम्यान, डोळ्यादेखत आईला वाहून जाताना मुले मोठ्याने ओरडत असून त्यांचा आवाज काळीज पिळवटून टाकत आहे. एक छोटीशी चूक आणि हलगर्जीपणा किती महागात पडू शकतो. हेच या व्हिडिओमध्ये दिसत आहे.