Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : आम्ही चुकलो, माफ करा… दादा गटाने घेतला शरद पवारांचा आशीर्वाद! बंद दाराआड नेमके काय घडले?

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 July 2023, 17:52

Politics मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करू अजित पवार गटाने मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व आठ मंत्र्यांसह आज अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. (Politics)  प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. (Politics)

या वेळी अजित दादा गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या नेत्यांनी शरद पवार यांना विनंती केली. पण शरद पवार यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले. आम्ही चुकलो असं सांगत माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी आदल्या दिवशीच दादा गटाच्या सगळ्या नेत्यांनी शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे जाऊन भेट घेतली. सगळ्या मंत्र्यांनी पुन्हा शरद पवार यांना भाजपला पाठिंबा देण्याविषयी गळ घातली. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ आदी नेत्यांनी पवारांचं मन वळविण्याचं प्रयत्न केला.

 

या भेटीविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या आमदारांनी शरद पवार यांना भेटणे ही अनपेक्षित घटना आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही चर्चा करू. ते अचानक भेटले आहेत. त्यातून काय उद्देश आहे. हे आज सांगणं अवघड आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खंत व्यक्त केली. तुम्ही मार्गदर्शन करावं असं म्हणाले. गुंता सोडवण्यास सांगितले. पण शरद पवार यांनी भाष्य केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

प्रफुल पटेल म्हणाले की, आदरणीय शरद पवार यांना विनंती केली, त्यांच्यासाठी आमच्या मनात आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहू शकतो, याचा विचार करावा, तसेच येणाऱ्या काळातील राजकारणाविषयी मार्गदर्शन करावं, त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. पण आमच्या प्रस्तावावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

दरम्यान, अर्ध्या तासांहून अधिक वेळ ही बैठक सुरु होती. दादा गटाने दिलेल्या प्रस्तावावर पवार यांनी उत्तर दिले नाही. भाजपबरोबर जायचं नाही, हे आधीही शरद पवार यांनी दादांच्या समर्थक आमदारांना सांगितलं होतं. आजही कोणतंच उत्तर न दिल्यामुळे दादा गटाचा प्रस्ताव शरद पवार यांनी नाकारल्याची चर्चा होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Politics News : सरकार घटनाबाह्य, चहापानात आम्हाला स्वारस्य नाही... अधिवेशनापूर्वीच विरोधक एकवटले!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.