Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 July 2026, 8:06

पुणे : लोहगड किल्ल्यावरून झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. केतनच्या मृत्यूच्या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच, अग्रवाल परिवारावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातवाच्या हत्येचा तीव्र धक्का सहन न झाल्याने केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना काल निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

देवीचंद अग्रवाल हे काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची हृदयशस्त्रक्रिया झाली होती. मात्र, लाडक्या नातवाच्या अचानक जाण्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर ‘मिस यु डॅड’ अशी भावनिक पोस्ट शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दुसरीकडे, केतन अग्रवालच्या हत्येचा तपास पोलीस अत्यंत वेगाने करत आहेत. केतनला लग्नासाठी नकार द्यायचा असल्याने, त्याची होणारी बायको सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी मिळून त्याचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून दिले होते. या गुन्ह्या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन हे दोघेही एकमेकांशी ‘कोड वर्ड’मध्ये संवाद साधत होते. गुन्ह्याचे रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीच त्यांचे दोन मोबाईल जप्त केले होते. मात्र, गुरुवारी पोलिसांनी सियाचा आणखी एक छुपा मोबाईल हस्तगत केला आहे. या दुसऱ्या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोघांमधील संशयास्पद संभाषण आणि हत्येचा नेमका कट शोधण्यासाठी हे तिन्ही फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा आणि त्यांच्यातील गुप्त संभाषणाचा खरा खुलासा समोर येईल, असा विश्वास पोलिसांना आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

Branchengrößen zeigen sich begeistert: Winshark Casino startet in Deutschland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.