Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर 8 विद्यार्थ्यांचा बळी; आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’च्या 5 जणांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 22 October 2026, 13:53

आळंदी : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेप्रकरणी अखेर आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’च्या पाच जणांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहलीचे नियोजन, ठरलेल्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या समुद्रकिनारी विद्यार्थ्यांना नेणे आणि सुरक्षेची साधने न पुरवणे, यांसारखे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.

अकॅडमीचे संस्थापक शिक्षक अमर गोटीराम आदक (वय 29), मृणाल सुरेश नारखेडे (वय 30), सबा महबूब इनामदार (वय 27), शिल्पा अमर आदक (वय 27) आणि वैष्णवी मृणाल नारखेडे (वय 28, सर्व रा. आळंदी देवाची, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत केळगाव येथील युवराज बबनराव वहिले (वय 42) यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकॅडमीतील अकरावीच्या विद्यार्थ्यांना रायगड किल्ला व श्रीवर्धन बीच येथे सहलीसाठी नेण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, रायगड किल्ल्यावरील रोप-वे बंद असतानाही त्याचे शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना पायरीमार्गे गडावर नेण्यात आले. त्यानंतर नियोजित श्रीवर्धन बीचऐवजी विद्यार्थ्यांना दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील निर्जन ठिकाणी नेण्यात आले.

विद्यार्थ्यांना पोहता येत नसल्याची माहिती असूनही त्यांना समुद्रात खेळण्यासाठी पाठवण्यात आले आणि आवश्यक सुरक्षा साधने पुरवण्यात आली नाहीत, असा आरोप तक्रारीत आहे. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तक्रारदारांच्या मुलासह आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी पुढील तपास करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दिल्लीत हाय व्होल्टेज बैठक! मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा; अर्थखात्यावरून पुन्हा खलबतं? राष्ट्रवादीत मोठ्या बदलांचे संकेत

Thursday, 22 October 2026, 15:10

सरकारला घाम फोडणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’समोर मोठं संकट! थेट अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार?

Thursday, 22 October 2026, 15:09

पुणेकरांनी खायचं तरी काय? पुण्यात पुन्हा FDAची मोठी धाड; तब्बल ९,८८८ लिटर खाद्यतेल आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त

Thursday, 22 October 2026, 15:03

‘मला लुटलं, चोरट्यांनी माझं अपहरण केलं’ रात्रीच्या अंधारात मुंबई-नाशिक हायवेवर भयानक प्रकार; ८.५ कोटींचा दरोडा; ज्यानं तक्रार केली तोच निघाला मास्टरमाइंड

Thursday, 22 October 2026, 14:59

धरणात पाणी माणसांसाठी; मुक्या जीवांनी तहान कुठे भागवायची? खडकवासला प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन रद्द; शेती, पशुधन, वन्यजीव आणि भटक्या प्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

Thursday, 22 October 2026, 14:32

पत्नीवर वाईट नजर असल्याचा संशय अन् संतापाचा कडेलोट!74 वर्षीय वृद्धाची हत्या करून जाळलं; सरणावरील एका डागानं उघड केलं भयंकर सत्य!

Thursday, 22 October 2026, 14:30
Next Post

‘गोकुळ’च्या पराभवानंतर महायुतीचे आत्मपरीक्षण !जिल्हा बँकेत नेत्यांची बैठक ; हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकरांसह विजयी आणि पराभूत उमेदवार उपस्थित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp