Pune News : पुणे : कामाच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेवून महिलांना लुटणाऱ्या ४ जणांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चार जणांना अटक;
नितीन साहेबराव चव्हाण (वय-३०), संतोष नागोराव कानोडे (वय-२०), सुकलाल बाजीराव गिरी (वय-१९) आणि सुनिल नारायण गिरी (वय-१९, सर्व. रा. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आमच्या सोबत चला, तुम्हाला काम देतो, असे सांगून चार अनोळखी व्यक्तींनी महिलेला चाकी गाडीतून जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे नेले. त्यानंतर डोंगराकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर नेऊन तक्रारदार महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल हॅन्डसेट आणि रोख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. (Pune News)
दरम्यान, निर्जन स्थळ असल्याने महिलेला काहीही करता आलं नाही. त्यानंतर महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली.
आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन चार जणांना अटक केली आहे. (Pune News)