(Pimpri Crime ) पिंपरी : नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहणाऱ्या एका संगणक अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १९) बावधन परिसरात घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
सायली वासुदेव बट्टे (वय २४, मूळ रा. झाशीनगर, गडचिरोली) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गडचिरोलीतील भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव बट्टे आणि माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची सायली ही कन्या आहे.
एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला…!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली बट्टे ही आपल्या भावासोबत नोकरीच्या निमित्ताने काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीत ती चांगल्या पदावर काम करत होती. वर्क फ्रॉम होम असल्याने ती अनेकदा घरातच असायची. तसेच तिच्यासोबत तिचा भाऊ देखील राहात होता. तिचा भाऊ कामानिमित्ताने गडचिरोलीला गेला होता. त्यामुळे सध्या ती एकटीच राहत होती.
शनिवारी (१८ मार्च) सायलीने कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. हिंजवडी पोलिसात घटनेची नोंद झाली असून संबधित तरुणीच्या नातेवाईकांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, सायलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून मानसिक तणावातून तिने जीवन संपवल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अनेक दिवसांपासून एकत्र राहणाऱ्या बहिणीने आत्महत्या केल्याने भावाला धक्का बसला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Suicide News | मेडिकल चालक तरुणाची केडगाव रेल्वेलाईनवर आत्महत्या!