जीवन सोनवणे
Satara News : सातारा : गणेशोत्सव 2023 निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142(1) मधील तरतुदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, गणेश चतुर्थीनिमित्त (दि.19) जिल्ह्यात मद्य विक्री बंदी आदेश दिले आहेत.
सर्व दारूदुकाने, बिअरबार आणि ताडी दुकाने राहणार बंद
या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व देशीदारू किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-2) विदेशी मद्य विक्री (एफएल-2), परवानाकक्ष (एफएल-3), बिअर बार (फॉर्म–ई) व ताडी दुकान टीडी-1 या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवायच्या आहेत. (Satara News) या आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्ती धारकाने उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध मुंबई मद्य निषेध कायदा 1949 व त्याअंतर्गत असलेल्या नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल.
तसेच अनुज्ञप्ती बंदच्या कालावधीची नुकसान भरपाई दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : अहिरे ग्रामपंचायत हद्दीत आढळला २६ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह..