पुणे : भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ आज गुरुवार (ता. ३) काँग्रेसकडून पुण्यात मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोटारसायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आले. भारत जोडो यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
यावेळी, काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, प्रशांत बधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक मानकर, शुक्राचार्य वांजळे, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, दत्ता बहिरट, बाळासाहेब दाभेकर, संगीता तिवारी, पुजा आनंद यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा येत्या काही दिवसांत राज्यात दाखल होणार आहे. राहुल गांधी यांची यात्रा कन्याकुमारी ते काशमीर अशी आहे. तसेच या यात्रेला पुणेकरांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.