लहू चव्हाण
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीचे बंद केलेल्या सबसिडी पुन्हा सुरु कराव्यात . आणि आधुनिक शेतीसाठी शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी भिलार येथील नितीनदादा भिलारे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर व राज्याचे कृषिमंत्री अब्द्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
राष्ट्रीय फळबाग मंडळाच्या बैठकीसाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर व राज्याचे कृषिमंत्री अब्द्दुल सत्तार हे पुणे येथे आले होते. यावेळी नितीन भिलारे यांनी घेऊन महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विविध मांडल्या.
महाबळेश्वर तालुका हा अतिदुर्गम असून स्ट्रॉबेरी हे येथील मुख्य पीक आहे. येथील शेतकरी हा स्ट्रॉबेरी च्या उत्पादनावर अवलंबून असतो. परंतु अलीकडच्या काळात वातावरणतील बदलामुळे आणि यावेळी पडणाऱ्या पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे .
महाबळेश्वर स्ट्रॉबेरी जीआय नामांकन प्राप्त असून सध्या वातावरणातील बदलामुळे हे पीक धोक्यात आले आहे यासाठी इथल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षणात्मक शेती आणि इनडोअर व्हर्टिकल शेती या आधुनिक शेती तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. तसेच राष्ट्रीय फळबाग मंडळाकडून या पूर्वी मिळणारे अनुदान व सबसिडी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. हे अनुदान पुन्हा सुरु करुन महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
या विषयावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन सन्माननीय मंत्री महोदयांनी दिले आहे .