पुणे : भारतातील सर्वोच्च न्यायालय हे देशाची राजधानी दिल्ली येथे आहे. याच सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकते. सर्वोच्च न्यायालयात रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात सहाय्यक निबंधक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दिल्ली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://main.sci.gov.in/वरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक निबंधक.
– नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली.
– वेतन / मानधन : दरमहा 1,48,586 /- पर्यंत.
– वयोमर्यादा : 56 वर्षे.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : रिक्रूटमेंट सेल, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001.