Monday, May 19, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, मोदींनी केलं अभिनंदन; कोण आहेत सुधा मूर्ती?

Editorby Editor
Friday, 8 March 2024, 16:15

Pune Prime News : प्रसिद्ध लेखिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुधा मूर्ती यांनी म्हटलं आहे की, त्या सध्या भारतात नाहीत. परंतु, महिला दिनानिमित्त त्यांना मिळालेली ही मोठी भेट आहे. देशासाठी काम करण्यासाठी एक नवीन जबाबदारी मिळाली आहे. मूर्ती यांनी या निवडीबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन

सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती केल्याने मला आनंद होत आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान खूप मोठे आणि प्रेरणादायी आहे. सुधा मूर्ती यांची राज्यसभेमधील उपस्थिती हे नारीशक्तीचं शक्तिशाली उदाहरण आहे. राज्यसभेतील उत्तम कारकिर्दीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

कोण आहेत सुधा मूर्ती?

सुधा मूर्ती इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या लेखिका म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहेत. सुधा मुर्ती या महिला आणि लहान मुलांसाठी काम करत आहेत. त्यांची संस्थादेखील यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये काम करतात. सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती. त्यासाठी सुरुवातीच्या काळात सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती यांना १०,००० रुपये उधार दिले होते. सुरुवातीच्या काळात मुर्ती दाम्पत्य एका छोट्याशा घरात भाड्याने राहत होते.

त्या काळात त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. आज त्यांची इन्फोसिस ही देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. त्याचबरोबर जगभरातल्या नावाजलेल्या आयटी कंपन्यांमध्ये इन्फोसिसचं नाव घेतलं जातं. इन्फोसिसमध्ये ३ लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. मूर्ती यांच्या मुलाचीही स्वतःची स्वतंत्र कंपनी आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलीचा इंग्लंडमध्ये मोठा व्यवसाय आहे. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मूर्ती यांचे जावई आहेत.

PM Narendra Modi tweets, “I am delighted that the President of India has nominated Sudha Murty to the Rajya Sabha. Sudha Ji’s contributions to diverse fields including social work, philanthropy and education have been immense and inspiring. Her presence in the Rajya Sabha is a… pic.twitter.com/DuV8dZb4oT

— ANI (@ANI) March 8, 2024

Editor

Editor

ताज्या बातम्या

सोने स्वस्त झाले कि महाग? जाणून घ्या, पुणे, मुंबईतील दर

Monday, 19 May 2025, 15:07

Loni kalbhor News : लोणी स्टेशन येथून 500 लिटर ताडी जप्त ; अवैध विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Monday, 19 May 2025, 15:05

पुणे : सुनेच्या मृत्यु प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राजेंद्र हगवणे यांची पत्नी, मुलगा आणि मुलीला पोलिसांकडून अटक

Monday, 19 May 2025, 14:53

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांना केंद्र सरकारचा पुरस्कार; शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावल्याबद्दल गौरव

Monday, 19 May 2025, 14:31

लोणी काळभोर येथील एच पी पंपासमोर चारचाकीने घेतला अचानक पेट, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Monday, 19 May 2025, 14:07
man committed suicide in koregaon mul uruli kanchan pune

Uruli Kanchan News: कोरेगाव मूळ येथील विवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

Monday, 19 May 2025, 13:57
Next Post

रेल्वेखाली उडी घेत लोणी स्टेशन येथील तरुणाची आत्महत्या

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.