पुणे प्राईम न्यूज: बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे म्हणावं तसं लक्ष देता येत नाही. परिणामी, काहीना काही आजार उद्भवू लागतात. त्यापैकी एक म्हणजे रक्तदाब अर्थात बीपी. मग तो हाय असो किंवा लो काळजी घ्यावीच लागते. पण हाय बीपी अर्थात उच्च रक्तदाबाची काही लक्षणे आहेत ती जाणवल्यास वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण होते.
अनेकदा थकवा आणि तणावामुळे आपल्याला डोकेदुखी होऊ लागते. ज्यावर आपण वेदनाशामक औषधांनी उपचार करतो. मात्र, डोकेदुखी हे देखील उच्च रक्तदाबाचे कारण असू शकते. जेव्हा मेंदूला पुरेसे रक्त मिळत नाही. तेव्हा मेंदूवर अतिरिक्त दबाव पडतो. त्यामुळे तीव्र डोकेदुखीची तक्रार असते. त्यामुळे जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमचा रक्तदाब जरूर तपासा.
याशिवाय, उच्च रक्तदाबामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जर अचानकपणे अंधुक दिसत असेल तर या लक्षणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. कारण ते उच्च रक्तदाबाचे लक्षणे असू शकतात. बराच वेळ काम केल्यानंतर थकवा जाणवणे हे सामान्य आहे. मात्र, जेव्हा हा थकवा तुम्हाला त्रास देत असेल तेव्हा लगेच रक्तदाब लक्षात घ्या. हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.