Hadapsar News : हडपसर, (पुणे) : महिलेसोबत अश्लील बोलून मानसिक त्रास देणाऱ्या सुपरवायझरवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शनिवारी (ता. २१) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खराडी परिसरात राहणाऱ्या २८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रभुदास हरीभाऊ डोंगरे, वय- ४५ रा. देवाची उरळी, होले वस्ती, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुपरवायझरचे नाव आहे.
हडपसर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या हडपसर परिसरातील एका नामांकित टॉवरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. (Hadapsar News) तर आरोपी डोंगरे हा महिलेचा सुपरवायझर आहे. फिर्यादी या कामावर असताना आरोपीने त्यांचा सतत अपमान केला.
दरम्यान, अश्लील बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पीडित महिलेने तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. (Hadapsar News) पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Hadapsar News : मगरपट्टा परिसरात अश्लील चाळे करुन भररस्त्यात महिलेचा विनयभंग, दोघांना बेड्या..