Big Breaking News : पुणे : हडपसर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची चौकशी केली असता, ते बॉम्ब स्फोटातील आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कमरुल मंडल असे या आरोपीचे नाव आहे. मंडल याने बांगलादेश, बेनापोल याठिकाणी बॉम्बस्फोट केल्यानंतर त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर भारतात घुसखोरी करुन तो पुण्यात वास्तव्य करत होता, अशी माहिती हडपसर पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान, अटक करण्यात आलेले बांगलादेशी आरोपी पश्चिम बंगाल येथील बँक खात्यातून बांगलादेशात पैसे पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रकरणाचा सखोल तपास न करता हडपसर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी मंडल याने पुण्यातून भारतीय पासपोर्ट तयार करुन घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. कमरुल मंडल याच्यासह इतर सहा संशयित बांगलादेशी घुसखोरांना १५ ऑगस्ट २०२१ रोजी ताब्यात घेतले होते. त्यावेळी मंडल याने आपण बांगलादेशी असल्याची कबुली दिली होती. (Big Breaking News) या प्रकरणाचा सखोल तपास न करता हडपसर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते. या प्रकरणात भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) युनिटने लक्ष घातल्यानंतर हडपसर पोलिसांनी पुन्हा मंडल सह बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना १४ ऑक्टोबर रोजी अटक केली. तर इतर ११ जणांवर गुन्हा दाखल केला.
या वेळी पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींना आधार, पॅन कार्ड यासारखे भारतीय ओळपत्र पुण्यातील एजंटने तयार करुन दिल्याचे समजले.(Big Breaking News) त्यानुसार पोलिसांनी कागदपत्रे तयार करुन देणारा पुण्यातील एजंट शंकर उर्फ संग्राम नेकरामसिंग पवार (वय ५३, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मोहम्मदवाडी, पुणे) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत.
न्यायालयाने अटक केलेल्या पाच आरोपींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाची माहिती घेतली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमध्ये बदल करून जमिनी हडपल्या; मावळ, मुळशीतील प्रकार