Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमध्ये बदल करून जमिनी हडपल्या; मावळ, मुळशीतील प्रकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 October 2023, 15:14

Big Breaking News  : पुणे : सातबारा संगणकीकृत करून तो घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने पूर्ण केला. मात्र, या प्रकल्पांतर्गत मूळ सातबारा आणि संगणकीकृत करण्यात आलेला सातबारा यांमध्ये अनेक ठिकाणी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे गैरप्रकार करण्यात आले आहेत. याबाबत राज्य शासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे शासनाने गेल्या दहा वर्षांत कलम १५५ चा वापर करून दिलेल्या आदेशांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यात मावळ व मुळशी या दोन तालुक्यांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

तपासणीचे सरकारचे आदेश

हा प्रकल्प राबविताना तहसील, तलाठी, मंडल स्तरावर हस्तलिखित सातबाऱ्यावर भोगवटादार म्हणून असलेल्या कुळांची नोंद, कुळांची नावे इतर हक्कात टाकण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी कुळांची नावे काढून टाकली आहेत. (Big Breaking News ) तहसीलदार स्तरावर कलम १५५ चा वापर करून अनेक ठिकाणी सातबाऱ्यावरील नोंदी, तसेच आकारीपडच्या जमिनींचे शेरे काढणे, वारस नोंदी काढून टाकणे किंवा नव्याने वारस नोंद करणे हे बदल परस्पर करून नवीन सातबारा उतारा अनेकांनी तयार केला आहे. त्यामुळे मूळ सातबारा आणि संगणकीकृत केलेला सातबारा उतारा यामध्ये तफावत येत आहे.

महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे गैरप्रकार करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गेल्या दहा वर्षात दरुस्ती केलेल्या दाखल्यांची तपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. (Big Breaking News ) त्यानुसार उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समिती स्थापन करून एक महिन्याच्या आत राज्य शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

 

विभागीय आयुक्त राव यांनी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यांत तालुकानिहाय उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदारांची समिती स्थापन केली आहे. या समितीने एका महिन्याच्या आत संबंधित दाखल्यांची छाननी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.(Big Breaking News ) महसूल विभागांतर्गत सातबारा उताऱ्यावर असणारे शेरे कमी करणे, शर्तीचे शेरे काढणे, कुळकायद्यानुसार दाखल करण्यात आलेले शेरे, आकारीपड, वारस नोंदी, लेखन प्रमादाची दुरुस्ती आदी नोंदी कलम १५५ अंतर्गत आदेश पारीत करण्यात येतात. त्यानुसार अभिलेखामध्ये दाखले देताना अनियमितता आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.

पुरंदर येथील नियोजित विमानतळ, मेट्रो, दोन वर्तुळाकार रस्ते या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील जमिनींना मोठा भाव मिळत आहे. त्याचा फायदा घेत रिअल इस्टेट व्यवसायातील दलालांनी स्थानिकांना पैशांचे आमिष दाखवून एक, दोन गुंठ्यांच्या जमिनी गुंतवणूकदारांना विकल्या आहेत. त्यामुळे २०१८ मध्ये संगणकीकृत सातबाऱ्याच्या तपासणीमध्ये हवेली, जुन्नर, खेड तालुक्यांमधील एका सातबारा उताऱ्यावर १०० पेक्षा अधिक खातेदारांची नावे असल्याने हे तालुके मागे राहिले होते.

दरम्यान, तुकडाबंदी कायद्यामुळे एक, दोन गुंठे जागा विकता येत नाही. मात्र, तरीदेखील शहरालगतच्या गावांमध्ये जमिनींचे तुकडे करून मोठ्या प्रमाणात विकण्यात आले आहेत. परिणामी सातबारा संगणकीकरणाचे काम रखडले होते.(Big Breaking News ) सातबारा संगणकीकरण केलेला सातबारा उतारा म्हणजे मूळ सातबारा आणि डिजिटल सातबारा हे एकसारखे असायला हवेत (मिरर इमेज) मात्र, मूळ सातबारा उतारा आणि डिजिटल सातबारा उताऱ्यांमध्ये फरक असल्याचे समोर आले आहे. हा बदल परस्पर करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big Breaking News : अजित पवारांच्या अडचणी वाढणार; मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात खळबळजनक दावा

Big Breaking News : बनावट कंपनी काढून, गुंतवणूकदारांची १०० कोटींची फसवणूक; ‘ईडी’चे कात्रजमध्ये छापे

Big Breaking News : बनावट कंपनी काढून, गुंतवणूकदारांची १०० कोटींची फसवणूक; ‘ईडी’चे कात्रजमध्ये छापे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Hadapsar News : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मालकाकडून विनयभंग ; लोणी काळभोर येथील दुकान मालकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.