साहेबराव लोखंडे
Shirur News : टाकळी हाजी : शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले सुरूच आहेत. दिवसाढवळ्या दिसणाऱ्या बिबट्यांमुळे ग्रामस्थांची भितीने गाळण उडत आहे. शेतात शेतमजूरांचा अभाव दिसून येत आहे. जुन्नर, आंबेगाव तालुक्यात बिबट्या मेंढपाळांच्या कुटूंबावर हल्ला करत असल्याच्या घटना देखील घडत आहेत. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
बिबट्यांमुळे ग्रामस्थांची भितीने गाळण
टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील साबळेवाडी येथील शेतकरी हरिदास खंडू उचाळे यांच्या दोन वर्षांच्या कालवडीवर बिबट्याने मंगळवारी (ता. १०) हल्ला करून ठार केले. (Shirur News) उचाळे यांच्याकडे पाच संकरित गायी असून, ही कालवड सर्वात निरोगी व उत्तम प्रतवारीतील होती. बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि बांधलेल्या दोरासह ओढल्याने खुंटी उपसली. तिला ओढत नेऊन जवळपास १०० फूट अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात तिचा फडशा पाडला.
गाय ओढून नेल्याने, हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असल्याची शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागातील बहुतांश शेतकरी शेतात राहतात. सर्वांची जनावरे बाहेर बांधलेली असतात. त्यामुळे सर्वांना घर आणि गोठ्याला कंपाऊंड करणे भाग पडणार आहे. (Shirur News) अनेकदा आवाज उठवूनही वनविभाग टाकळी हाजी परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे जनावरांबरोबरच मनुष्य सुद्धा बिबट्याच्या भक्षस्थानी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भिती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य विलास साबळे, बाबाजी साबळे, प्रियांका बारहाते यांनी परिसरात पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. (Shirur News) जांबूत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे या भागात देखील बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत.
दरम्यान, घर व गोठ्याभोवती तारेचे मजबूत कंपाऊड करून घ्या. शेत शिवारात काम करताना संघटीत होऊन जा. शेतावर मुलांना मोकळे सोडू नका. (Shirur News) काठी अथवा मोबाईलवरील गाणे सुरू ठेवा. हा भाग बिबट प्रवण क्षेत्रात समाविष्ट असल्याने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे वनविभागाकडून कळविण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूरमध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांनी जपला सामाजिक, धार्मिक सलोखा
Shirur News : मुखईच्या आश्रमशाळेची सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर निवड