नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून रिचार्ज प्लॅन आणले जात आहेत. त्यात आता रिलायन्स जिओने नवीन बेस्ट असा रिचार्ज प्लॅन आणला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये जिओने आपल्या प्लॅनच्या किमतीत वाढ केली आहे. तेव्हापासूनच ग्राहकांकडून दीर्घ वैधतेच्या प्लॅनची मागणी वाढली आहे. त्यामुळेच कंपनीने आता 72 दिवसांचा प्लॅन आणला आहे.
Jio च्या या नव्या प्लॅनमध्ये तुम्हाला इतके व्यावहारिक फायदे मिळतील की तुम्हाला पुन्हा रिचार्ज करण्याची चिंता करावी लागणार नाही. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारे बेनेफिट्स मिळणार आहेत. 28 दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी पुरेसा नसेल आणि 365 दिवसांचा प्लॅन खूप महाग वाटत असेल, तर जिओचा 72 दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. हा प्लॅन 72 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि 72 दिवसांसाठी अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग सुविधा देतो.
जर तुमचा डेटा वापर जास्त असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल. याशिवाय, कंपनी तुम्हाला डेटाची कमतरता जाणवू नये म्हणून स्वतंत्रपणे 20GB जीबी अधिक डेटा देईल. या संदर्भात, 72 दिवसांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 164 GB डेटा मिळेल. हा प्लॅन तुम्हाला 749 रुपयांत मिळू शकणार आहे.