पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या Youtube चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अनेक व्हिडिओज् याच्या माध्यमातून आपल्याला पाहता येत आहेत. त्यामुळेच व्हिडिओ क्रिएटर्सकडूनही दर्जेदार आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ तयार करण्याला प्राधान्य दिलं जात आहे. पण, जर काही व्हिडिओ अथवा कंटेंट आवडला नसेल तर Dislike चा पर्यायही आपल्याला मिळत आहे. त्यानुसार, आता Instagram वरही Dislike चा पर्याय मिळणार आहे.
Youtube पाठोपाठ Instagram वरही आता व्हिडिओ पाहिला मिळत आहेत. त्यामुळे आता याच Youtube च्या धर्तीवर Instagram वर लवकरच एक नवीन फीचर मिळणार आहे. Instagram यूजर्सना Dislike ची सुविधा मिळणार असून, सध्या या फीचरची चाचणी सुरू असल्याची माहिती दिली जात आहे. Instagram च्या नवीन फीचरमध्ये युजर्सना इन्स्टा कमेंट आवडली नाही तर ते Dislike करण्याचा पर्याय दिला आहे. हा पर्याय डाउनग्रेड अॅरोसारखा असणार आहे.
तुम्हाला हा पर्याय कमेंट सेक्शनमध्ये दिसणार आहे. हे फीचर Reddit च्या downvote सारखे असणार आहे. Instagram कडून आतापर्यंत या फीचरबाबत माहिती दिली जात नव्हती. मात्र, आता कंपनीने या फीचरची अधिकृत घोषणा केली आहे. असे जरी असले तरी किती जणांनी कमेंट Dislike केली हे कळणार नाही आणि किती जणांना कंटेंट आवडला हे कोणालाच कळणार नाही.