नवी दिल्ली : Apple चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन अशी ओळख असलेल्या iPhone 16e ची जगभरात विक्री सुरू झाली आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 59 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये Apple ची A18 चिप आणि Apple Intelligence यांसारखे महत्त्वाचे फीचर मिळणार आहे. मात्र, एक असे फीचर यामध्ये आता नसणार आहे.
iPhone 16e या फोनमध्ये नॅमिक आयलँडसह MagSafe चार्जिंग उपलब्ध नसेल. कंपनीकडून चार्जिंगवर विशेष असे लक्ष केंद्रित केले जात आहे. प्रत्येकाला आपला फोन लवकर चार्ज करायचा असतो. त्यात अनेक युजर्संना फोन चार्ज करण्यासाठी अनेक पर्याय हवे असतात. मात्र, आता नवीन आयफोनमध्ये MagSafe असेल अशी युजर्सची अपेक्षा होती. परंतु, हे फीचर आता उपलब्ध नसेल. यामागचे कारण काय, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Macrumors च्या रिपोर्टनुसार, iPhone 16e मध्ये MagSafe समाविष्ट नाही कारण iPhone 16e चे युजर्स त्यांच्या फोनला चार्जिंग केबल प्लग करून चार्ज करतात. MagSafe फीचर महत्त्वाचे आहे, कारण त्याच्या मदतीने लोक वायरलेस पद्धतीने त्यांचा iPhone जलद चार्ज करू शकतात. हे फीचर iPhone युजर्ससाठी फायद्याचे ठरत आहे. पण, तरीही iPhone 16e मध्ये हे फीचर दिस नाही. आता त्याऐवजी iPhone 16e मध्ये लायटनिंग कनेक्टरऐवजी USB टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.