सोलापूर : कारागृहात पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे चक्क कैद्यांकडूनच खड्ड्याची खोदाई करण्याचा प्रताप सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाने केला, त्यावरून मोठी खळबळ उडाली. सोलापूर शहरात दूषित पाणीपुरवठ्याची समस्या गेल्या काही दिवसांपासून उग्र रुप धारण करीत आहे. अशातच किडवाई चौकात असलेल्या सोलापूर जिल्हा कारागृहातही कमी दाबाने, आळ्या मिश्रित व दुषित पाणीपुरवठा होत आहे.
त्याबाबत महापालिकेला कारागृह प्रशासनाकडून नवीन जोडणीबाबत टाळाटाळ केली जात आहे. बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी कारागृहातील ४ कैद्यांकडूनच खड्डा खोदून घेतला व २ इंची पाईपलाईन बसवण्याचा खटाटोप केला. मात्र, संबंधित प्रकार काही जागरूक नागरिकांनी पत्रकारांना सांगितल्यावर पत्रकार तिथे पोहोचले. त्यांनी विचारणा केली असता पाणीटंचाईमुळे निर्णय घेतल्याचे म्हटले.