लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने बुधवारी (ता. १७) विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दहावी, बारावीचे तसेच पदवीधर विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, अशी माहिती पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी यांनी दिली.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील रोटरी क्लबमध्ये दुपारी चार वाजता हे शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात बाजारातील मागणी व पुरवठा नियम आणि त्याचा योग्य करिअरशी असलेला संबंध समजून घेणे, मालमत्तेची ओळख आणि निवडलेल्या करिअरशी त्याचा संबंध, करिअरचा पर्याय म्हणून आयआयएमचा परिचय आणि त्याची भविष्यातील व्याप्ती, करिअरचा पर्याय म्हणून यूपीएससी, एमपीएससी, सीजीएल, एसएससीची तयारी. आगामी काळातील टॉप ५ करिअर पर्याय, करिअर निवडताना विविध अडथळे समजून घेणे आणि या अडथळ्यांवर मात करण्याचे मार्ग आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी ९८६०८४४६२४, सचिव नितीन कासुर्डे ८८५७९९९६६६, अमित बोधे ९९६०४७८२२५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.