नागपूर: शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेजवळील दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका तरूणाने १७ शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून रवि लाखे( वय 32) या आरोपीला अटक केली आहे.
दुकानाचा मालक हजर नसल्याचा फायदा घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमध्ये शाळेजवळील दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका तरूणाने १७ शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. हा प्रकार एक नामांकित शाळेजवळ घडला आहे. त्यानंतर नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशन मध्ये नराधम आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानमालकाने शटरच्या दुरूस्तीसाठी आरोपी लाखे याला बोलावलं होतं.
शनिवारी(८ फेब्रुवारी ) दुपारी तो दुकानाचं काम करण्यासाठी आला होता. त्यानंतर स्टेशनरीच दुकान उघडं झाल्याने मुली दुकानात आल्या तेंव्हा दुकानाचा मालक दुकानदार नव्हता. याचा फायदा घेऊन नराधमाने त्या मुलींना आत बोलावलं. त्यानंतर तो शाळकरी मुलींशी अश्लील चाळे करू लागला. अश्या प्रकारे आरोपीने तब्बल १७ मुलींचा विनयभंग केला.
दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत कोणतीही मुलगी वाच्यता करत नव्हती. मात्र पीडित मुलींपैकी दोघींनी हिंमत करून घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तातडीने नंदनवन पोलिस स्टेशन येथे तक्रारही केली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीने गुन्हा दाखल करत नराधम आरोपी रविला अटक केली.