-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील किन्ही, तिवसाळा, जरंग, जरुर, आंबेझरी, मोवाडा व इतर गावांतील शेतकऱ्यांनी घाटंजी येथील बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेत खोटे व बनावट दस्तऐवज दाखल करुन फसवणूक केली. या प्रकरणी एकूण 60 आरोपींची घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 1 चे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात घाटंजी येथील बॅक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक यांच्या लेखी तक्रारीवरून घाटंजी पोलिस ठाण्यात 60 आरोपी विरुद्ध भादंवि कलम 468, 420 व सह कलम 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. घाटंजी पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करुन 30 एप्रिल 2008 रोजी घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्याचे घाटंजी न्यायालयातील प्रकरण क्रमांक RCC/48/2008 असे होते. सदर प्रकरणाचा 16 वर्षांनंतर घाटंजी न्यायालयात न्याय निर्णय झाला आहे. सदर प्रकरणात घाटंजी येथील ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे, ॲड. व्ही. बी. चव्हाण, ॲड. एम. बी. राठोड व ॲड. प्रेम (पीपी) राउत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा घाटंजी येथे किन्ही, तिवसाळा, जरंग, जरुर, आंबेझरी, मोवाडा व इतर गावांतील शेतकऱ्यांनी खोटे व बनावट दस्तऐवज दाखल करुन कर्ज उचलल्या प्रकरणी आरोपी शिवलाल राठोड, विलास आडे, नागोराव राठोड, विश्वनाथ मडावी, दशरथ आत्राम, सोनेराव टेकाम, भिमराव मेश्राम, धुरपती कुडमेथे, सावित्रीबाई सिडाम, धामीबाई मेश्राम, सतिश राठोड, भास्कर चौधरी, तानाबाई शेंडे, हवश्या पेंदोर, संतोष शेडमाके, जोगेंद्र वड्डे, पुणाजी पेंदोर, सुर्यभान शेडमाके, मोतीराम कुडमेथे, रावजी तोडसाम, पोतू मेश्राम, दौलत राठोड, नामदेव चव्हाण, रमेश राठोड, हुसेन आत्राम, रामेंद्र चव्हाण, कौसल्याबाई चव्हाण, हितेश राठोड, सोनाबाई जाधव, लक्ष्मीबाई ठाकरे, उषा मडावी, नंदू राठोड, प्रेम जाधव, हरसिंग पवार, सोनाबाई राठोड, रामदास जाधव, पांडुरंग जाधव, लखनलाल राठोड, सुंगा नैताम, वसंत राठोड, जंगलू गेडाम, बंडू आडे, पार्वतीबाई उईके, गुलाबराव राठोड, कौसल्याबाई राठोड, सुभाष राठोड, सकरु राठोड, नागोराव चव्हाण, फकीरा चव्हाण, परशराम चव्हाण, आनंदराव जाधव, जंगलू गेडाम, सकरु चव्हाण, रुपला जाधव, हरी राठोड, सुमनबाई पवार, गुलाब आडे, दादू जाधव, राम जाधव, लक्ष्मी जाधव या 60 आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे नोंदविण्यात आले होते.
या आरोपी पैकी खटला सुरू असतांनाच सकरु राठोड, परशराम चव्हाण, जंगलू गेडाम या सह चार आरोपींचा मृत्यू झाला होता. सदर प्रकरणातील 60 आरोपींची पुराव्या अभावी सर्वच आरोपींची घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 1 चे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांनी निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्यात घाटंजी न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे, ॲड. व्ही. बी. चव्हाण, ॲड. मनोज राठोड व ॲड. प्रेम राउत (पीपी) यांनी काम काज पाहीले.