Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या…’ : देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 November 2024, 11:05

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अनेक नेत्यांच्या प्रचार सभा होत असून बैठका सुद्धा पार पडत आहेत. काहींच्या मुलाखती होताना दिसत आहेत. अशातच मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणार की दिल्लीत याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्यावेळपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात 2019ला आमच्या 105 जागा आल्या होत्या. आता त्याहीपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. त्यापेक्षा कमी येणार नाहीत. विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही मुख्यमंत्रि‍पदासाठी आपण इच्छूक नसल्याचे सूतोवाच केले होते. मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आई. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करणार आहे. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

…. म्हणून शिंदेंना अजितदादांपेक्षा जास्त जागा

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त जागा का मिळाल्या, या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली आहे. अजित पवार एक वर्षे उशिराने सरकारमध्ये आले. त्यांना दीड वर्षेच मिळाले. त्यातही अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती. त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडे सुद्धा लक्ष दिले. शिवाय त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचाही फायदा मिळाला. त्यामुळेच त्यांना लढविण्यासाठी जास्त जागा मिळाल्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15
Next Post

पुण्यात मुठा नदीच्या पात्रात आढळला ज्येष्ठ महिलेचा मृतदेह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp