Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत 536 कोटींची मालमत्ता जप्त…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 November 2024, 12:13

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचारही जोरदार केला जात आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यातपर्यंत पोहोचला आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. अशातच राज्यात आतापर्यंत 536 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली, यात रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू यासह विविध गोष्टींचा समावेश आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने राज्यात आचारसंहिता लावली आहे. आयोगाकडून राजकीय पक्ष आणि नागरिकांसाठी काही नियम घालून दिले आहेत. मात्र, यांचे काही जणांना भान नाही. महिनाभरात राज्यात 6 हजारांपेक्षा जास्त आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याशिवाय आयोगाकडून 536 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात 6 हजार 382 तक्रारी प्राप्त झाल्या असून आतापर्यंत 536 कोटींहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. दरम्यान, 15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजील अॅपच्या माध्यमातून सहा हजारांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथक तपास करून योग्य ती कारवाई करते.

सध्या राज्यभरात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. तसेच सी-व्हिजील अॅपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करु शकतात. हे अॅप कोणत्याही अॅपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29

पुण्यात फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल’ वॉच! आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांच्या हातात आले खास साधन

Monday, 26 October 2026, 20:44

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! २ महिन्यांच्या पगाराइतका बोनस जाहीर पण कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 October 2026, 20:43

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09
Next Post

पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे दोन गट आमनेसामने; कोयते, तलवारीसह बंदुकीने एकमेकांना धमकी; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp