Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 26 October 2026, 22:01

पुणे/मुंबई : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावरील सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी वाहनांच्या प्रवेशाबाबत आणि वेगमर्यादेबाबत नवे नियम निश्चित करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबर २०२६ पासून वाहतूक व्यवस्थेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून, खासगी कारसाठी कमाल वेगमर्यादा १०० किमी प्रतितास, तर प्रवासी बससाठी ८० किमी प्रतितास असेल.

महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, खासगी कार, जीप, एसयूव्ही आणि परवानगी असलेल्या इतर हलक्या मोटार वाहनांना मिसिंग लिंकचा वापर करता येणार आहे. तसेच प्रवासी बस आणि अधिकृत प्रवासी वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

मिसिंग लिंकवर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये पिकअप व्हॅन आणि टाटा एससारख्या हलक्या मालवाहू वाहनांचाही समावेश आहे. ज्वलनशील पदार्थ, स्फोटके किंवा इतर धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर प्रवेश करता येणार नाही.

प्रवेशबंदी असलेल्या मालवाहू आणि अवजड वाहनचालकांनी मिसिंग लिंकऐवजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या मूळ मार्गिकेचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मिसिंग लिंकवरील निर्धारित वेगमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.

– खासगी कार आणि इतर परवानगी असलेली हलकी मोटार वाहने : १०० किमी प्रतितास
– प्रवासी बस आणि इतर अधिकृत प्रवासी वाहने : ८० किमी प्रतितास

बोगद्यांमधून प्रवास करताना वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी आणि निर्धारित वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिसिंग लिंकवर जाण्यापूर्वी आपल्या वाहनाला प्रवेशाची परवानगी आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. मालवाहू आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी या मार्गावर जाणे टाळून जुन्या द्रुतगती महामार्गाचा वापर करावा. नव्या नियमांमुळे मिसिंग लिंकवरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29

पुण्यात फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल’ वॉच! आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांच्या हातात आले खास साधन

Monday, 26 October 2026, 20:44

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! २ महिन्यांच्या पगाराइतका बोनस जाहीर पण कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 October 2026, 20:43

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp