Sad News : मुंबई : मनोरंजन क्षेत्रातून पुन्हा एका वाईट बातमी समोर आली आहे. महाभारतात शकुनीची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गुफी पेंटल हे हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांचे सहकलाकारा सुरेंद्र पाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कारार होणार आहे. (Death of Shakunimama aka Gufi Pental from ‘Mahabharata’; He breathed his last at the age of 78)
मुंबईतील रुग्णालयात मालवली प्राणज्योत
गुफी पेंटल यांच्या निधनाची वार्ता कळताच शोक व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला त्यांना फरीदाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले (Sad News) त्यानंतर त्यांना मुंबईत आणलं होतं. परंतु, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
गुफी पेंटल यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रफू चक्कर’ चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केले आहे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली.(Sad News) या पात्रामुळे ते घराघरात पोहोचले. त्यांचा मालिकेतील अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या निधनाने चाहते व मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
अभिनेता असण्याव्यतिरिक्त, गुफीने काही टीव्ही शो आणि श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपट देखील दिग्दर्शित केला.(Sad News) त्यांनी बीआर फिल्म्ससोबत असोसिएट डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे.