Sad News : मुंबई : मनोरंजन क्षेत्रातून वाईट बातमी समोर आली आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे आज (२३ जून) सकाळी दहा वाजता पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त होत आहे. प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रवीण यांच्या निधनाने मराठी चित्रपसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अवघ्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. अगदी लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटसृष्टीतील बारकावे समजून घेतले होते. (Sad News) त्यांचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ हे चित्रपट गाजले होते. प्रवीण कारळे यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी सहा वाजता वारजे इथं अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती कारळे यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sad News : पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्याची इच्छा राहिली अपुरी; रिक्षावर झाड पडून महिलेचा मृत्यू