लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : विद्यार्थीदशेत असताना खेळाचे व्यासपीठ मिळणे महत्त्वाचे असते. खेळामध्ये व्यापक सामाजिक दृष्टीकोन असतो. जाती-पातीतील भेदभाव नसतो. विद्यार्थी जिवनात खेळाचे महत्त्व जाणून मनसोक्त खेळल्यास पुढील आयुष्यात व्यक्ती यशस्वी होते, असे प्रतिपादन जिल्हा सहाय्यक क्रिडा अधिकारी सुनील कोळी यांनी केले.
जिल्हास्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेचे उद्घाटन
येथील विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर काॅलेजच्या क्रिडा संकुलावर, जिल्हा क्रीडा परिषद सातारा व जिल्हा अमॅच्युअर आर्चरी असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी क्रिडा अधिकारी कोळी बोलत होते. (Pachgani News) या वेळी विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर काॅलेजच्या डायरेक्टर भारती बिरामणे, मॅनेजिंग डायरेक्टर विराज बिरामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना विराज बिरामणे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. अनेक प्रतिभावान खेळाडू जिल्ह्यात असून, त्यांनी जिल्ह्याचे नाव रोशन करावे. १४, १७ व १९ वर्षांच्या आतील मुले-मुलींची जिल्हास्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेला जिल्हाभरातील धनुर्विद्या खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. (Pachgani News) स्पर्धेकरीता पंच म्हणून चंद्रकांत भिसे, शिवशंकर चोरट, प्रणित सुतार, सुरज ढेंबरे, अनिकेत गायकवाड, हेमंत लाडे, सुशांत साळुंखे, राजेंद्र जंगम, सचिन तिमुनकर, ओमकार भागवत, शिरिष ननावरे यांनी काम पाहिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ होणार १ ते ३ डिसेंबरदरम्यान
Pachgani News : कासवंड येथे बंद घराचे कुलूप उचकटून, एक लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास